01】 महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा?
→ सोलापूर
02】 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
→ अहमदनगर
03】 जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
→ 21 जून
04】 पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले?
→ 1761
05】 कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्विकृत केला?
→ 22 जुलै 1947
06】 वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला?
→ जेम्स वॅट
07】 भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे?
→ तेलंगणा
08】 अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
→ औरंगाबाद
09】 अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्रि कोण आहेत?
→ बहिणाबाई चौधरी
10】 डेसीबल या एककाने काय मोजतात ?
→ ध्वनीची तीव्रता
11】 लोणार हे उल्काजन्य सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
→ बुलढाणा
12】 तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हा रोग होतो?
उत्तर- कर्करोग
13】 डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे आहे?
→ ए
14】 महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी सुरू झाला?
→ शिरपूर
15】 उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
→ तोरणमाळ
16】 सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे?
→ महाराष्ट्र
17】 जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
→ 08 मार्च
18】 डायलीसिस उपचार कोणत्या आजारात करतात?
→ मूत्रपिंडाचे विकार
19】 कोवळ्या सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते?
→ ड
20】 महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली आहे?
→ भ्रंशमूलक उद्रेक
21】 अर्ध मॅरेथॉन चे अंतर किती असते?
→ 21 कि.मी
22】 भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचे प्रमाण किती आहे?
→ 2:3
23】 अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते?
→ कॅलरीज
24】 इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवामध्ये स्रवणारे संप्रेरक आहे?
→ स्वादुपिंड
25】 हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे?
→ फिनलंड
26】 करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला?
→ महात्मा गांधी
27】 मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?
→ मुंबई
28】 भारताचे तिनही दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?
→ राष्ट्रपती
29】 सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले?
→ वृक्षतोड विरोधी आंदोलन
30】 अणु ऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती?
→ डॉक्टर होमी जहांगीर भाभा
31】 जयपूर फूट चे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
→ डॉक्टर प्रमोद सेठी
32】 भारतातील तिन्ही ही संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात?
→ राष्ट्रपती
33】 पायराईट हे कशासारखे दिसते म्हणून त्याला फूल्सगोल्ड म्हणून ओळखले जाते?
→सोन्यासारखे
34】 इन्डोसल्फान हे कशाचे उदाहरण आहे?
→ कीडनाशक
35】 रक्ताच्या कर्करोगासाठी कोणती संज्ञा लागू होते?
→ ल्युकेमिया
36】 महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती स्विकारण्यासंबंधी नेमले गेलेली समिती कोणती आहे?
→ वसंतराव नाईक समिती
37】 गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो?
तलाठी
38】 पंचायतराज ही मूळ संकल्पना कोणाची आहे?
→ महात्मा गांधी
39】 परम-8000 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केला?
→ डॉ.विजय भटकर
40】 भारतामधील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखले जाते?
→ वाहन
41】 वि.वा शिरवाडकरांचे टोपण नाव कोणते?
→ कुसुमाग्रज
42】 संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
→ न्यूयॉर्क
43】 बुलढाणा जिल्ह्यात किती तालुके आहेत?
→ 13
44】 माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
→ रायगड
45】 सिद्धटेक हे अष्टविनायक गणपती चे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
→ अहमदनगर
46】 केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे?
→ राजस्थान
47】 विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
→ कोल्हापूर
48】 ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे?
→ ऑस्ट्रेलिया
49】 कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे?
→ इक्वेडोर
50】 अनातोलिया चे पठार कोणत्या देशात आहे?
→ तुर्कस्तान
51】 झुलू जमात कोठे आढळते ?
→ दक्षिण आफ्रिका
52】 सुएझ कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो?
→ भूमध्य सागर व लाल सागर
53】 कृष्णा नदीचे उगमस्थान कोणत्या राज्यात आहे?
→ महाराष्ट्र
54] शिवसमुद्रम नदी खोरे विकास योजना कोणत्या नदीशी संबंधित आहे?
→ कावेरी
55】 भारतीय रेल्वेचे दक्षिण-मध्ये झोनचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
उत्तर- सिकंदराबाद
56】 बुडापेस्ट कोणत्या देशाची राजधानी आहे?
→ हंगेरी
57】 अजिंठा -वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या वंशाच्या राज्यकर्त्यांच्या काळात निर्माण केले आहे?
→ राष्ट्रकूट
58】 सन 1885 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
→ व्योमेशचंद्र बॅनर्जी
59】 1905 मध्ये लंडन येथे इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली?
→ श्यामजी कृष्णा वर्मा
60】 फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली?
→ सुभाषचंद्र बोस
61】 मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे?
→ लोकमान्य टिळक
62】 कोणत्या कायद्याने भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून महाराणी 【क्राऊन】 कडे गेला?
→ भारत सरकार अधिनिय 1858
63】 मोर्ले-मिंटो सुधारणा या कोणत्या वर्षाच्या कायद्याशी संबंधित आहे?
→ 1909
64】 पहिल्या गोलमेज परिषदेचे वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते?
→ लॉर्ड आयर्विन
65】 महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे?
→ सविनय कायदेभंग
66】 Poverty and Un-british Rule in india चे लेखक कोण आहेत?
→ दादाभाई नौरोजी
67】 पुर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला?
→ 26 जानेवारी 1930
68】 भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
→ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
69】 राज्य पुर्नरचना आयोग 1953 चे अध्यक्ष कोण होते?
→ फाजलअली
70】 मूलभूत अधिकाराचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात केला आहे?
→ 03
71】 भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे?
→ धर्मस्वातंत्र्याचे अधिकार
72】 कोणत्या समितीच्या शिफारशीवरून राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?
→ स्वर्णसिंह समिती
73】 भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम हे राष्ट्रपतीच्या अध्यादेशाशी संबंधित आहे?
→ कलम 123
74】 संसदेच्या लोकलेखा समिती मध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात?
→ 22
75】 केंद्र व राज्य यांच्यातील संबंधाविषयी घटनेच्या कोणत्या प्रकरणात तरतूद आहे?
→ 11
76】 जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
→ 03 डिसेंबर
77】 हंबनटोटा बंदर कोणत्या देशात आहे?
→ श्रीलंका
78】 सुजय कशाशी संबंधित आहे?
→ ऑफशोअर पेट्रोलिंग व्हेसल
79】 बॉक्साईट धातुकापासून कोणते खनिज निष्कर्षण केले जाते?
→ ॲल्युमिनियम
80】 कोणती शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे व त्यातून पित्तरस स्त्रवतो?
→ यकृत
81】 आवाजाची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते आहे?
→ डेसिबल
82】 बाल्कन प्रदेश हा कोणत्या देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता?
→ तुर्कस्तान
83】 भारताने कोणत्या वर्षी अर्थव्यवस्थेचे जागतीकीकरण केले?
→ 1991
84】 भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?
→ अप्रत्यक्ष
85】 पंचायत समितीचा कार्यकारी - प्रशासकीय अधिकारी कोण असतो?
→ गटविकास अधिकारी
86】 क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य कोणते?
→ राजस्थान
87】 अष्टविनायकांपैकी किती गणेश मंदिरे ही पुणे जिल्ह्यात आहेत?
→ 05
88】 अहमदनगर-कल्याण मार्गावर कोणता घाट आहे?
→ माळशेज
89】 पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
→ वेलवंडी
90】 भारत सरकारने कोणत्या दिवशी चलनातून 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता?
→ 08 नोव्हेंबर 2016
91】 कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होय.
→ तेलबीया
92】 निरा- नरसिहापुर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते?
→ इंदापुर
93】 बहुजन समाजास राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी कोणी 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली?
→ छत्रपती शाहू महाराज
94】 पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे?
→ जॉन चेसन
95】 महाबळेश्वर मधील पॉईंट मध्ये समुद्रसपाटीपासून सर्वात उंचावर कोणता पॉईंट आहे?
→ आर्थरसीट
96】 साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्यास प्रथम मराठ्यांच्या राजधानीचा मान कोणी दिला?
→ छत्रपती राजाराम राजे
97】 समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर मूळचे कोणत्या तालुक्यातील होते?
→ कराड
98】 महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे?
→ पुणे
99】 कोणता दिवस पोलीस शहीद दिन म्हणून साजरा जातो?
→ 21 ऑक्टोंबर
100】 कोणत्या योजनेच्या अंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते?
→ मनोधैर्य
वरील सामान्य ज्ञानवर आधारित प्रश्न आपणास कसे वाटले तसेच काही चुका अथवा सुधारणा असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा?
वरील माहिती आपण पहा आणि आवडल्यास इतरांना ही नक्की Share करा.
धन्यवाद...!!
वरील माहिती आपण पहा आणि आवडल्यास इतरांना ही नक्की Share करा.
धन्यवाद...!!






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!