⊍ छत्रपती संभाजीराजे भोसले
छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले हे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते.
» पूर्ण नाव
छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले
» अधिकारकाळ
१६ जानेवारी १६८१ ते ११ मार्च १६८९
» राज्याभिषेक
१६ जानेवारी १६८१
» राज्यव्याप्ती
पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्री डोंगररांगां पासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून ते दक्षिण भारतात तंजावर पर्यंत
» राजधानी
किल्ले रायगड
» जन्म
१४ मे १६५७
किल्ले पुरंदर, महाराष्ट्र
» मृत्यू
११ मार्च १६८९
वढू बुद्रुक जि. पुणे
【समाधीः वढू, महाराष्ट्र】
» पूर्वाधिकारी
छत्रपती शिवाजी महाराज
» उत्तराधिकारी
छत्रपती राजाराम महाराज
» सरसेनापती
सरसेनापती हंबीरराव मोहिते
» वडील
छत्रपती शिवाजी महाराज
» आई
महाराणी सईबाई
» पत्नी
महाराणी येसूबाई
» अपत्ये
भवानीबाई, शाहू पहिले
» राजघराणे
भोसले
» राजब्रीदवाक्य
श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरीव राजते, यंदकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरी
» चलन
होन व शिवराई
⊍ बालपण
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले.
संभाजी महाराजांच्या आई, महाराणी सईबाईंचे निधन महाराज लहान असतानाच झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ ही स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांची आजी राजमाता जिजाबाई यांनी केला. त्यांच्या सावत्र आई, पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली. मात्र त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनी संभाजी महाराजांना पोरकेपणाने वागवले तसेच संभाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला.
अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी
संभाजीराजे फक्त ०९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांनी होऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मुघल सैनिकांचा संभाजी राजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजी महाराज सुखरूपपणे स्वराज्यात दाखल झाले.
⊍ तरुणपण
इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात राजमाता जिजाऊंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.!
तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजी महाराजांचा अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला
सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. पण संभाजी महाराजांना ते मान्य होणे कठीण होते. अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजी महाराजांच्या विरोधात गेले.
दरबारातील काही मानकरी संभाजी महाराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले; हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या सांगण्यावरून केले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजी महाराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे संभाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार पाठवावे लागले.
⊍ मुद्रा व दानपत्र
।।श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते । यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि।।
अर्थः छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे, आकाशाप्रमाणे अमर्याद आहे. या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस, प्रत्येक प्राणिमात्र महाराजांच्या छत्रछायेखाली असेल. छत्रपतींच्या या राजमुद्रेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही.!
संभाजी महाराजांना साधुसंतांबद्दल आदरभाव होता. कुडाळ ग्रामनिवासी नामदेवभट्टपुत्र बाकरेशास्त्री यांना करून दिलेल्या संस्कृतमधील दानपत्रावरून त्यांचा आदरभाव कळतो. छत्रपती संभाजी महाराजांना राजपद महत्प्रयासाने प्राप्त झाले होते. त्यांनी राजपद प्राप्तीसाठी नवस केला होता आणि त्यांना राज्याधिकार मिळाल्यानंतर तो नवस फेडण्याच्या इच्छेने त्यांनी नामदेवभट्टपुत्र बाकरेशास्त्री यांना दरसाल १०,००० पादशाही होनांचे संस्कृत दानपत्र करून दिले. हे दानपत्र संभाजी महाराजांच्या मंचाकारोहणानंतर एका महिन्याने म्हणजे २४ ऑगस्ट १६८० 【भाद्रपद शुद्ध १० सोमवार शके १६०२】 रोजी केले आहे. या दानपत्राच्या सर्वात वर मधोमध संभाजी महाराजांची १६ बुरुजी मुद्रा आहे व खाली सुवाच्य अक्षरात संस्कृतमध्ये २ ओळी लिहिल्या आहेत. त्या स्वतः शंभूराजांच्या हस्ताक्षरातील आहेत.त्या ओळी खालीलप्रमाणे :
।।मतं मे श्री शिवराजपुत्रस्य श्रीशंभूराज
⊍ धार्मिक धोरण
०६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी गोपळभट अग्निहोत्री महाबलेश्वरकर यांच्या पुत्रास लिहिलेल्या पत्रात एक अतिशय समर्पक असे वाक्य आले आहे. ते वाक्य असे, .. राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य..युवराज शंभू राजे छत्रपती झाल्यानंतर त्यांचे अलौकिक आणि अद्भुत अशा कार्याचा जर कुणी आढावा घेतला तर त्याला पदोपदी या वाक्याची प्रचीती येते. त्यांचे राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहितदक्षता या सर्व बाबींमध्ये त्यांनी आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला दिसतो. या प्रमाणेच त्यांच्या धार्मिक धोरणावरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो.
⊍ संतांना राजाश्रय
०१】 संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा मोरे यांस छत्रपती संभाजी महाराजांनी वर्षासनाची नेमणूक करून दिली. 【दि.१९ ऑगस्ट १६८०】
०२】 शिवकालातील प्रसिद्ध पाटगावचे मौनीबाबा यांच्या पालखीस भोई व वाजंत्रीची कायमची व्यवस्था लावून दिली. त्यासाठी वार्षिक १२५ होनांचे आज्ञापत्र करून दिले. 【दि.१३ सप्टेंबर १६८०】
०३】 समर्थ रामदास स्वामींनी अंगापूरच्या डोहात मिळालेल्या राममूर्तीची चाफळ येथे स्थापना करून मंदिर उभारले. तेथील पूजेअर्चेसाठी व नैवेद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी चैत्र शु. १ शके १५९७ रोजी सनद करून दिली. तीच पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी चालू ठेवली. तसेच चाफळच्या यात्रेस जमणाऱ्या भाविकांना लष्करातील लोकांचा अथवा मुसलमानी सैन्याचा त्रास होऊ नये व यात्रा यथासांग पार पडावी म्हणून वासुदेव बाळकृष्ण या आपल्या अधिकाऱ्यास आज्ञापत्र लिहिले. 【दि.१८ ऑक्टोबर १६८०】
०४】 चिंचवडचे श्री मोरया गोसावी यांच्या 'माणसांस, शेतापोतांस तसेच गुरांढोरांस काडीचाही तसविज देऊ नये' यासाठी आपल्या लष्करी अधिकाऱ्यास ताकीदपत्र लिहिले. 【दि. ६ नोव्हेंबर १६८०】
०५】 प्रचंडगडाच्या पायथ्याशी गडाच्या संरक्षणासाठी आलेल्या लोकांच्या गाई व म्हशी यांची चराई 【वणी】 छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांनी पण माफ केली
⊍ सक्तीच्या धर्मांतरास विरोध
छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांप्रमाणेच सक्तीने धर्मांतर करणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज, व मुसलमान सत्ताधीशांना कडाडून विरोध केला. छत्रपती संभाजी महाराज व हेनरी ग्यारी यांच्यात इ.स. १६८४ साली झालेल्या तहातील एक कलम आहे,' That the English shall buy none of my people belonging to my dominion, to make them slaves or Christians'.
⊍ प्रधान मंडळ
सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले
श्री सखी राज्ञी जयति छत्रपती येसूबाई संभाजीराजे भोसले 【संभाजीराजांच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी】
• सरसेनापती - हंबीरराव मोहिते
• छांदोगामात्य - कवी कलश
• पेशवे - निळो मोरेश्वर पिंगळे
• मुख्य न्यायाधीश - प्रल्हाद निराजी
• दानाध्यक्ष - मोरेश्वर पंडितराव
• चिटणीस - बाळाजी आवजी
• सुरनीस - आबाजी सोनदेव
• डबीर - जनार्दनपंत
• मुजुमदार - अण्णाजी दत्तो
• वाकेनवीस - दत्ताजीपंत
⊍ औरंगजेबाची दख्खन मोहीम
औरंगजेबाने इ.स. १६८२ मध्ये मराठ्यांवर आक्रमण केले. औरंगजेबाचे सैन्य मराठ्यांच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर औरंगजेबाचे साम्राज्य संभाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. त्याकाळी जगातील सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला.मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा होय. औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. संभाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूशी एकहाती झुंज दिली.!
⊍ दगाफटका
इ.स. १६८९ च्या सुरुवातीला संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. ०१ फेब्रुवारी १६८९ रोजी बैठक संपवून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने संगमेश्वरावर हल्ला केला, फ्रेंच गवर्नर गेनरल मार्टीनने त्याच्या डायरीत याची नोंद करून ठेवली आहे, की जवळच्या ब्राम्हणांनी महाराजांशी दगाफटका केला. कारवाईसाठी गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीमहाराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवी कलश यांना जिवंत पकडले.
⊍ महाराजांना वाचवण्याचे प्रयत्न
छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरी पकडले गेल्यानंतर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न झाले नाही असे नाही. महाराजांना वाचवण्यासाठी प्रयत्न मावळ्यांनी केले पण ते त्यात यशस्वी झाले नाही. यात सर्वात पहिला प्रयत्न हा जोत्याजी केसरकर यांनी केला. पुढे जाऊन अप्पा शास्त्री यांनी देखील महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला पण हे दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले.
⊍ शारीरिक छळ व मृत्यू
छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड, आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. 'औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून स्वतंत्र जिवन जगन्याचे' किंवा इस्लाम धर्म स्वीकार करून मुसलमान बनल्यास जीवनदान देण्याचे मान्य केले. पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाला गुप्त मदत करणारऱ्या संभाजी महाराजच्या ब्राह्मण मंडळीने संभाजी महाराज आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. शेवटी त्यांना हिंदु धर्म ग्रंथा नुसार नर्क यातना देऊन क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला.
⊍ साहित्य
अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचा उत्तम जाणकारही होता. संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला
बुधभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील शिवाजीराजे यांचा उल्लेख आहे :
'कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं यः ।
जगतः पतिरंशतोवतापोः (तीर्णः) स शिवछत्रपतिजयत्यजेयः
अर्थ-"कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा, करितो धर्माचा हास
तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभुंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥ "
याचबरोबर संभाजी महाराजांनी नायिकाभेद, नखशिखा, सातशतक या तीन ग्रंथांचे लिखाण केले. गागाभट्टांनी समयनय हा ग्रंथ लिहून संभाजी महाराजांना अर्पण केला.
⊍ संभाजीमहाराजांविषयी इतिहास लेखन
• सभासद बखर - कृष्णाजी अनंत सभासद.
• चिटणीस बखर - मल्हार रामराव चिटणीस
• ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा डॉ. सदाशिव शिवदे
• अद्वितीय छत्रपती श्रीसंभाजी महाराज - अनंत दारवटकर
• राजा शंभूछत्रपती - विजयराव देशमुख
• पोर्तुगीज कागदपत्रे - डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर
• पोर्तुगीज-मराठे संबंध - डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर
• फ्रेंच-मराठा संबंध - लेखक ?
• बिकानेर पुरालेखाभिगार - राजस्थान
• संभाजीकालीन पत्रसार संग्रह
• छत्रपती संभाजी महाराजांची पत्रे : डॉ. सदाशिव शिवदे यांच्या या पुस्तकात छत्रपती संभाजीराजांच्या ३१५ पत्रांचा परिचय करून देण्यात आला आहे.
• शाक्तवीर संभाजी महाराज - अॅडव्होकेट अनंत दारवटकर
• छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती 【डॉ. केदार महादेवराव फाळके】
• छ. संभाजी स्मारक ग्रंथ संपादन- डॉ. जयसिंगराव पवार
• श्री शंभूछत्रपती स्मारक ग्रंथ संपादक सुशांत संजय उदावंत
• रणझुंजार : डॉ. सदाशिव शिवदे
• शिवपुत्र संभाजी : डॉ. कमल गोखले
• सभासद बखर
• चिटणीस बखर
• शेडगावकर बखर
• पंतप्रतिनिधी बखर
• बावडेकर अमात्यांची बखर
• न्यायशास्त्री बखर
इत्यादी निरनिराळ्या मराठी बखरींमध्येही संभाजीराजांसंबंधी माहिती मिळते.
• मोगल दरबाराची बातमीपत्रे
⊍ ललित साहित्य
छत्रपती संभाजी महाराजांवरील ऐतिहासिक कथा कथने आणि कादंबऱ्या खालीलप्रमाणे आहेत.
• अर्घ्य - नयनतारा देसाई
• आम्ही यातनांचे स्वामी वा. ना. देशपांडे
• खरा संभाजी - प्रा. नामदेवराव जाधव
• छत्रपती संभाजी - मनमोहन नातू
• छावा - शिवाजी सावंत
• धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज - अरुण जाखडे
• मराठी साहित्यातील संभाजी प्रबंध - डॉ. शालिनी मोहोड
• मराठ्यांची धारातीर्थे - प्रवीण व. भोसले
• मी मृत्युंजय संभाजी - संजय सोनवणी
• राजा शंभू छत्रपती - विजय देशमुख
• शंभूराजे - दशरथ यादव 【काव्य】
• शंभूराजे - प्रा. सु.ग. शेवडे
• शहेनशाह - ना. सं. इनामदार
• शापित राजहंस - अनंत तिबिले
• शिवतेज संभाजी 【त्रिमिती चरित्र】 - संतोष रासकर
• शिवपुत्र - राजकुंवर बोबडे
• शिवपुत्र संभाजी - डॉ. कमल गोखले
⊍ नाटके
छत्रपती संभाजी महाराजांवरील काही प्रमुख नाटके खालीलप्रमाणे
• इथे ओशाळला मृत्यू -लेखक : वसंत कानेटकर
• चैतन्यगाथा तेजपुत्राची
• संगीत छत्रपती संभाजी - लेखक : आत्माराम मोरेश्वर पाठारे
• बेबंदशाही - लेखक : वि.ह. औंधकर
• मृत्युंजय
• मृत्युंजय अमावस्या 【महा-नाट्य】 - लेखक/दिग्दर्शक : नीलेश भिसे
• राजसंन्यास - राम गणेश गडकरी 【नाटक】• मानी मराठा - नाना कोचरेकर 【नाटक】
• अश्रू ढळले रायगडाचे अर्जुनराव झेंडे, 【नाटक】
• वज्रदेही संभाजी - ना.ल. मोरे 【नाटक】
• रायगडाला जेव्हा जाग येते - लेखक: वसंत कानेटकर
• शंभुराजे 【महानाट्य】 - लेखक : नितीन बानुगडे पाटील
• शूर संभाजी
• शिवपुत्र शंभुराजे 【महानाट्य】 -दिग्दर्शन/संवादः महेंद्र महाडीक
• नरशार्दुल राजा संभाजी -लेखक - इंद्रजित सावंत
वरील स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या विषयीची माहिती आपणास कशी वाटली तसेच काही चुका अथवा सुधारणा असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा?
वरील माहिती आपण पहा आणि आवडल्यास इतरांना ही नक्की Share करा.
धन्यवाद...!!
वरील माहिती आपण पहा आणि आवडल्यास इतरांना ही नक्की Share करा.
धन्यवाद...!!
संकलन - ए.ए.हिले
【स्रोत - विकिपीडिया】






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!