29 ऑक्टोबर हा जागतिक इंटरनेट दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. भारतात 1995 मध्ये इंटरनेट उपलब्ध झाले असले, तरी त्यापूर्वी कित्येक वर्षे अमेरिकेत व काही युरोपियन देशांमध्येही त्यासंबंधीचं संशोधन सुरू होतं. 29 ऑक्टोबर 1969 हे वर्ष विज्ञानाच्या दृष्टीने क्रांतिकारी होतं. 21 जुलै 1969 रोजी नील आर्मस्ट्रॉगन चंद्रावर पाऊल ठेवलं. त्याच वर्षी 29 ऑक्टोबर 1969 रोजी इंटरनेटवरचा जगातला पहिला संदेश ऑनलाईन पाठवला गेला. म्हणूनच 29 ऑक्टोबर हा दिवस जागतिक इंटरनेट दिन म्हणून साजरा केला जातो.
1960 च्या दशकात अमेरिकन सैन्याला इंटरनेटसारखी गुप्त व्यवस्था संदेशवहनासाठी हवी होती त्यादृष्टीने अमेरिकन संरक्षण खात्यानं एका संशोधन प्रकल्पाला अर्थसहाय्य देऊन अमेरिकेतील काही विद्यापीठांकडे त्या संशोधनाचे आव्हान सोपवलं होतं. या प्रकल्पांतर्गत एकूण चार संगणक अमेरिकेतील चार विद्यापीठामध्ये जोडण्यात आलेले होते.या चार संगणकाचे हे जगातले पहिले इंटरनेट होतं.चार संगणकापैकी एक होता कॅलिफोर्निया लॉस एंजेलिस विद्यापीठात, तर दुसरा होता स्टैनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधन विभागात तिसरा आणि चौथा संगणक कॅलिफोर्निया सांता बार्बरा आणि उता विद्यापीठात बसविलेला होता. 1969 चे ते संगणक म्हणजे आजच्यासारखे प्रगत नव्हते. मॉनिटर्स तर खूपच मोठे व चमकणारे असत. कॅलिफोर्नियामध्ये चार्ली क्लिने या संगणकप्रणाली निर्मात्याने एका संगणकावरून दुसऱ्या संगणकाला इलेक्ट्रॉनिक संदेश पाठवला. पहिल्या वेळी पाठविलेल्या login या शब्दापैकी केवळ lo शब्द पोचल्यानंतर सिस्टिम फेल झाली. पुढील अक्षरे जाऊ शकली नसली, तरी दूरसंचार आणि तंत्रज्ञानाच्या इतिहासामध्ये या दिवसाला खूप महत्त्व आहे. असा तो 29 ऑक्टोबर 1969 चा प्रसंग अमेरिकन विद्यापीठ, त्यातील तरुण विद्यार्थी आणि अमेरिकन सैन्य एकमेकांना कशी पूरक ठरत होती.
अशा प्रकारे 54 वर्षांपूर्वी दोन तरुणांनी इंटरनेटवरचा पहिला संदेश पाठवला. मोबाईलवर इंटरनेट वापरणाऱ्या आजच्या तरुण पिढीच्या दृष्टीन चार्ली आणि बिल गेल्या पिढीतले असले तरी ही त्या पिढीनं येणाऱ्या पिढीसाठी यशस्वी संशोधन केल्यानंतरच हे शब्द आज सहजपणे जगभर फिरताहेत. संगणकांच्या छोट्या छोट्या गटांना जोडत जगभरामध्ये निर्माण झालेल्या जाळ्यालाच वर्ल्डवाईड वेब किंवा इंटरनेट असे म्हणतात माहिती किंवा ज्ञानाच्या महासागराला लोकांच्या मोठ्या गटापर्यंत पोचविण्याचे काम या जाळ्यामार्फत होत असते. आजवर ज्ञान ही केवळ काही लोकांचीच मक्तेदारी असल्याचे मानले जात होते. त्यामध्ये इंटरनेटच्या निर्मितीमुळे खऱ्या अर्थाने बदल घडला आहे. त्यामुळे या प्रणालीला खरीखुरी लोकशाही प्रणाली म्हणता येईल. सुरवातीच्या काळात इंटरनेट हे अर्पानेट 【Advanced Research Projects Agency Network】 या नावाने ओळखले जात असे.
अन्न, वस्त्र, निवारा आणि इंटरनेट या चार जीवनावश्यक गोष्टीं असून प्रत्येक श्वास आज प्राणवायूपेक्षा इंटरनेटच्या मदतीने चालत आहे. त्याची जीवनावश्यकता ल जगाने ओळखली असून त्याचे अनन्य साधारण महत्व आहे
आजची तरुण पिढी संपर्कासाठी इंटरनेटचा वापर अफाट करीत असून सोशल मिडिया अँपचा वापर सध्या अफाट केला जात आहे हे आजचं त्रिकालाबाधित सत्य आहे. जगभरातील विविध समाज, गट इंटरनेटमुळे एकमेकांशी संपर्क साधू शकतात. सामाजिक देवाण घेवाण वाढली असून ज्ञानाचे भांडार सर्वांसाठी खुले झाले आहे. आपण काही क्षणात आपले मत दुसऱ्यापर्यंत पोचवू शकतो.सोशल नेटवर्किंगमुळे एकमेकाच्या संपर्कात राहणे सोपे झाले आहे.मोबाईल मध्येही इंटरनेटचा वापर सुरू झाल्याने ग्रामीण भागामध्ये इंटरनेटचा प्रसार वेगाने झाला असून. तरुण पिढी आज 24 तासांपैकी जास्तीत जास्त वेळ मोबाईलमध्ये घालवताना दिसत आहेत. अस असले तरी स्क्रीनवर रोखलेले डोळे बाजूला करून आजूबाजूच्या वेगवान जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहणे आवश्यक आहे.इंटरनेटमुळे आजच्या तरुण पिढीसमोर प्रचंड ज्ञान भंडार, संपर्काचं सुख, छायाचित्र, संगीत, ध्वनी वगैरेंनी परिपूर्ण जेवणाचे ताटच उपलब्ध झाले असून मोबाईलमधून ते मिळत आहे.
Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!