सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...
〉 IICA ने कॉर्पोरेट आणि महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी लीन कॅम्पस स्टार्टअप्स आणि WEICI इंडियासोबत सामंजस्य करार केला
〉 रशिया व भारताने इग्ला एअर डिफेन्स सिस्टिमचा पुरवठा आणि उत्पादन करारावर स्वाक्षरी केली
〉 भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, डायना एडुलजी आणि श्रीलंकेचा अरविंदा डी सिल्वा यांचा ICC हॉल ऑफ फेम 2023 मध्ये समावेश करण्यात आला
〉 रिअर अॅडमिरल सीआर प्रवीण नायर यांनी भारतीय नौदलाच्या वेस्टर्न फ्लीटचे फ्लीट कमांडर म्हणून कमांड स्वीकारले
〉 ओडिशामध्ये खो खो उच्च कार्यक्षमता केंद्र स्थापन करण्यासाठी ओडिशा सरकारने AM/NS इंडियासोबत सामंजस्य करार केला
〉 नुकतीच भारत ओपेक ऊर्जा संवादाची सहावी बैठक ऑस्ट्रिया येथे पार पडली
〉 बिकानेरवालाचे संस्थापक केदारनाथ अग्रवाल यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले.
〉 कॅनडाने बिली जीन किंग कप 2023 चे विजेतेपद पटकावले आहे.
〉 42 वा भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा नवी दिल्लीत सुरू झाला.
〉 पोरबंदरमध्ये वार्षिक नेव्हल एज्युकेशन सोसायटी कॉन्फरन्स 2023 आयोजित करण्यात आली .
〉 ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांची ब्रिटनचे नवे परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.
〉 श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरनचा बायोपिक 800 रिलीज झाला.
〉 आईसलँडमध्ये तीव्र भूकंपानंतर आणीबाणी जाहीर करण्यात आली .
〉 जकार्ता येथे 10 वी आसियान संरक्षण मंत्र्यांची बैठक होणार आहे.
〉 भारताने शहरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आशियाई विकास बँकेसोबत 【ADB】 S400 दशलक्षचा करार केला.
〉 एपीईडीएने प्रायोगिक तत्त्वावर नेदरलँडला केळीची पहिली खेप निर्यात केली.
〉 भारताने 32 वी वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अॅनिमल हेल्थ 【WOAH】 परिषद 2023 चे आयोजन केले आहे.
〉 नुकतेच केरळ राज्य सरकारने अध्यान मोबाईल अॅप लाँच केले आहे.
〉 जल संसाधन सहकार्यावरील भारत-ऑस्ट्रेलिया संयुक्त कार्यगटाची 6 वी बैठक आयोजित करण्यात आली.






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!