■ आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय दिन
〉 जागतिक मत्स्य पालन दिन
〉 जागतिक दूरदर्शन दिन
〉 जागतिक नमस्कार दिवस
〉 हुतात्मा स्मृति दिन 【महाराष्ट्र】
■ 21 नोव्हेंबर महत्वाच्या घटना
〉 1877
थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली.
〉 1911
संसदेच्या निवडणुकीत उभे राहता यावे आणि मतदानाचा अधिकार मिळावा म्हणुन लंडनमध्ये स्त्रियांनी केलेल्या मोर्चाच्यावर व्हाईट हॉल येथे पोलिसांनी लाठी हल्ला केला.
〉 1942
राजा नेने दिग्दर्शित दहा वाजता हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
〉 1955
संयुक्त महाराष्ट्रसाठी लढा पुकारला.
〉 1962
भारताचे संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती झाली.
〉 1962
भारत चीन युद्ध - भारतीय प्रदेशावर आक्रमण करणाऱ्या चीनने 19 नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.
〉 1971
भारीतय वायुदलाची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धातील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक, पाकिस्तानचा पराभव झाला.
〉 1962
दक्षिण कोरियाने नवीन संविधान स्वीकारले.
■ 21 नोव्हेंबट जन्म / जयंती
〉 1694
फ्रेंच तत्त्वज्ञानी व्हॉल्तेर यांचा जन्म.
【मृत्यू - 30 मे 1778】
〉 1899
ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री हरेकृष्णा महाबत यांचा जन्म.
【मृत्यू - 02 जानेवारी 1987】
〉 1910
चीनी भाषेतील लेखक छ्यान चोंग्शू यांचा जन्म.
〉 1926
हिंदी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते प्रेम नाथ यांचा जन्म.
【मृत्यू - 3 नोव्हेंबर 1992】
〉 1927
नाटककार शं.ना.नवरे यांचा जन्म.
【मृत्यू - 25 सप्टेंबर 2013】
〉 1987
भारतीय बुद्धीबळपटू ईशा करवडे यांचा जन्म.
■ 21 नोव्हेंबर मृत्यू / पुण्यतिथी
〉 1908
देशभक्त सत्येंद्रनाथ बोस यांना अलीपुर कारागृहात फाशी दिली गेली.
〉 1963
प्रसिद्ध विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी यांचे निधन.
【जन्म - 19 जानेवारी 1892】
〉 1970
नोबेल विजेते भारतीय भौतिकशास्त्रज सर चंद्रशेखर व्यंकटरमण 【सी. व्ही. रमण】 यांचे निधन.
【जन्म - 07 नोव्हेंबर 1888】
〉 1996
नोबेल विजेते एकमेव पाकिस्तानी भौतिकशास्त्रज डॉ.मोहम्मद अब्दूस सलाम यांचे निधन.
【जन्म: 29 जानेवारी 1926】
〉 1997
आचार्य बाळाराव सावरकर यांचे निधन.
〉 2015
भारतीय-पाकिस्तानी कवी व राजकारणी अमीन फहीम यांचे निधन.
【जन्म - 04 ऑगस्ट 1939】






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!