〉 २३°३०' ते ६६°३०' उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान सूर्यकिरण थोडेसे तिरपे पडतात. त्यामुळे या भागात तापमान फार जास्त किंवा फार कमी नसते. या पट्ट्यास काय म्हणतात ?
» समशीतोष्ण पट्टा
〉 ६६°३०' ते ९०° अक्षवृत्त दरम्यानच्या प्रदेशास .... पट्टा म्हणतात.
» शीत पट्टा
〉 समुद्रसपाटीपासून उंचीनुसार तापमानात होणाऱ्या बदलास. तापमानाचे ...... वितरण असे म्हणतात.
» ऊर्ध्व
〉 विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे जाताना कमी-अधिक वायुदाबाचे पट्टे दिसून येतात. विषुववृत्तापासून ५° उत्तर व ५° दक्षिण अक्षवृत्तादरम्यानच्या प्रदेशात विषुववृत्तीय .... पट्टा पसरला आहे.
» कमी दाबाचा
〉 उत्तर व दक्षिण गोलार्धात २५° ते ३५° अक्षवृत्तांदरम्यान .... पट्टा पसरला आहे.
» जास्त दाबाचा
〉 दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती झाल्यानंतर इंग्लंडमध्ये कोणत्या पक्षाचे सरकार अस्तित्वात आले ?
» मजूर पक्षाचे
〉 'खुदा-ई-खिदमद्गार' म्हणजेच 'लाल डगलेवाले' या संघटनेचे जनक व 'सरहद्द गांधी' म्हणून सर्वपरिचित असलेले नेते कोण आहेत.
» खान अब्दुल गफारखान
〉 इंग्लंडचा मजूरपक्षीय पंतप्रधान क्लेमंट अॅटली याने “भारतीयांना स्वतःची घटना तयार करण्याचा अधिकार आहे." असे जेव्हा जाहीर केले ....
» १५ मार्च, १९४६
〉 भारतात २ सप्टेंबर, १९४६ रोजी अधिकार रूढ झालेल्या हंगामी राष्ट्रीय सरकारचे पंतप्रधान कोण होते.
» पंडित जवाहरलाल नेहरू
〉 मृत्युसमयीचे गांधीजींचे शेवटचे उद्गार कोणते होते.
» "हे राम!”
〉 बर्लिन येथे एका रशियन तरुणीकडून बाँब तयार करण्याची माहिती असलेले रशियन पुस्तक कोणी भाषांतरित करून घेतले होते.
» सेनापती बापट
〉 १९१६ मध्ये राष्ट्रसभेच्या लखनौ अधिवेशनात मुस्लीम लीग व राष्ट्रसभा यांच्यात समझोता घडून आला होता या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते.
» बाबू अंबिकाचरण मुझुमदार
〉 एखाद्या व्यक्तीच्या हालचाली केवळ संशयास्पद वाटल्या तरी त्याला अटक करण्याचा अधिकार शासनास देणारा 'काळा कायदा' कोणता.
» रौलट अॅक्ट
〉 'चले जाव' ठरावाचा मसुदा कोणी तयार केला होता.
» पंडित जवाहरलाल नेहरू
〉 मुस्लीम लीगने कोणता दिवस 'प्रत्यक्ष कृतिदिन' म्हणून पाळला होता.
» १६ ऑगस्ट, १९४६
〉 पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर किती आहे.
» १४,९६,००,००० कि. मी.
〉 प्रकाशाचा प्रतिसेकंद वेग किती असतो.
» २,९९,७९२ कि. मी.
〉 सूर्यकुलातील सर्वांत लहान, परंतु वेगवान ग्रह कोणता.
» बुध
〉 पृथ्वीपेक्षा जवळजवळ अकरा पट मोठा असलेला कोणता ग्रह सूर्यकुलातील सर्वांत मोठा ग्रह आहे.
» गुरु
〉 पृथ्वीपेक्षा जवळजवळ अकरा पट मोठ्या असलेल्या गुरु ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या किती पट आहे.
» ३१८ पट
〉 गॅमा किरणांची गती अल्फा किरणांच्या गतीहून .... असते.
» अधिक
〉 पिवळा फॉस्फरस .... मध्ये द्रावणीय आहे.
» बेन्झीन
〉 .... हा वायू नॅचरल गॅसमध्ये असतो.
» इथिलिन
〉 अभिक्रियाकारकातील अणूंमधील बंध तुटण्याची प्रक्रिया ही .... असते.
» उष्माग्राही
〉 किरणोत्सारित मूलद्रव्याने एक बीटा कण उत्सर्जित केला की त्याचा अणुक्रमांक .... ने वाढतो.
» एक
〉 कठीण पाणी मृदू करण्यासाठी कशाचा वापर करतात.
» सोडिअम कार्बोनेट
〉 लाकडात कोणता प्रमुख घटक असतो.
» सेल्युलोज
〉 गॉज व लिंट ही वैद्यकीय उपचाराची साधने तयार करताना .... हा धागा प्रामुख्याने वापरला जातो.
» रेयॉन
〉 कोणत्या प्रक्रियेद्वारा अमोनिया वायू तयार केला जातो.
» हेबर प्रक्रिया
〉 खनिज लोखंडापासून शुद्ध लोखंड तयार करताना कोणते क्षपणक वापरतात.
» कोक
〉 कंपायमान ताऱ्यास .... अशी संज्ञा आहे.
पल्सर
〉 ताऱ्यांची प्रतवारी लावण्याचा पहिला प्रयत्न ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात कोणत्या शास्त्रज्ञाने केला.
» हिप्पार्कस
〉 हवाई पर्वतरांग आणि अल्बेट्रॉसचे पठार कोणत्या महासागरात आहे ?
» पॅसिफिक
〉 नुसत्या डोळ्यांनी दिसणाऱ्या ताऱ्यांमध्ये कोणता तारा सर्वाधिक तेजस्वी आहे. ताऱ्यास 'डॉगस्टार' म्हणून ही 'सिरियस' म्हणूनही ओळखले जाते.
» व्याध
〉 २१ मार्च व २३ सप्टेंबर हे दिवस काय म्हणून ओळखले जातात.
» विषुव- दिन
〉 युरोप व आफ्रिका ही खंडे आणि अमेरिका खंड यांदरम्यान कोणता महासागर पसरलेला आहे.
» अटलांटिक
〉 उत्तर ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोणता आहे.
» रॉबर्ट पिअरे, अमेरिका
〉 दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोणता आहे.
» एल्ड अमुंडसेन, नॉर्वे
〉 इ. स. १४९२ मध्ये वेस्ट इंडीज बेटांचा शोध कोणी लावला.
» ख्रिस्तोफर कोलंबस, इटली
〉 इ. स. १४९८ मध्ये कोणी केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारताकडे येणारा जलमार्ग शोधून काढला.
» वास्को- द-गामा
〉 जालियनवाला बाग अमृतसर येथील हत्याकांड कधी घडून आले..
» १३ एप्रिल, १९९९
〉 "माझ्याजवळ आणखी दारूगोळा असता तर मी अधिक लोक मारले असते." अशी दर्पोक्ती काढणारा जालियनवाला बागेतील अमानुष हत्याकांड घडविणारा लष्करी अधिकारी कोण होता.
» जनरल डायर
〉 डिसेंबर, १९२९ मध्ये लाहोर येथील राष्ट्रसभेच्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली.हे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली भरले होते ?
» पंडित जवाहरलाल नेहरू
〉 महात्मा गांधी आणि व्हाइसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्यामध्ये 'गांधी-आयर्विन करार' कधी घडून आला.
» ५ मार्च, १९३९
〉 इंग्लंडचे पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर करून हरिजनांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्याचे कधी घोषित केले.
» ऑगस्ट, १९३२
〉 कोणत्या राज्यात इतर कोणत्याही राज्यापेक्षा लोकसभेच्या अधिक जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत ?
» मध्य प्रदेश
〉 केंद्र व राज्ये यांच्यात वाटप करावयाच्या महसुलाची रूपरेषा ठरविणे हे कोणाचे प्राथमिक कार्य आहे ?
» वित्त आयोग
〉 प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असल्याचे घटनेच्या कोणत्या कलमा मध्ये स्पष्ट केलेले आहे.
» २१५
〉 राज्यघटनेतील परिशिष्ट अ कोणत्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीत घटनेत समाविष्ट केले गेले?
» पं. जवाहरलाल नेहरू
〉 ५१ व्या घटनादुरुस्तीनुसार सिक्कीम, मिझोराम यांसारख्या छोट्या राज्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या जास्तीत जास्त किती राहणार आहे.
» बारा
〉 भारताचे संरक्षण, अणुऊर्जा, रेल्वे, खाणी, आयकर हे विषय घटनेच्या परिशिष्ट ७ मधील कोणत्या सूचीत नमूद केलेले आहेत ?
» केंद्र सूची
〉 शिक्षण, कुटुंबकल्याण, वीज, वने हे विषय घटनेच्या परिशिष्ट ७ मधील कोणत्या सूचीमध्ये दिलेले आहेत.
» समवर्ती
〉 पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक आरोग्य हे विषय घटनेच्या परिशिष्ट ७ मधील कोणत्या सूचीमध्ये नमूद केलेले आहेत.
» राज्य सूची
〉 राष्ट्रपती कोणत्या कलमान्वये आणीबाणी पुकारतात तेव्हा घटनेतील १९ वे कलम व त्यात अंतर्भूत असलेली सहा स्वातंत्र्ये आपोआपच रद्दबातल ठरतात.
» ३५२
〉 भारताच्या घटना समितीचे वैधानिक सल्लागार म्हणून कोणाचा नामनिर्देश केला जातो ?
» डॉ. बी. एन. राव
〉 सल्फ्युरिक आम्ल त्वचेवर पडले असता तीव्र जखमा होतात; कारण ते .... आहे?
» तीव्र निर्जलक
〉 चुनकळी व वाळू यांपासून काय तयार होते.
» कॅल्शिअम सिलिकेट
〉 'बोर्डो मिश्रण' हे उत्कृष्ट .... असून, कॉपर सल्फेट हा या मिश्रणातील प्रमुख घटक असतो.
» कवकनाशक
〉 'झिक फॉस्फाइड' हे काय आहे.
» मृषकनाशक
〉 'पॅरिसग्रीन' व 'गॅमेक्सिन' ही .... होत.
» कीडनाशके
〉 कोणते अत्यंत प्रभावशाली कीडनाशक आहे.
» बेन्झीन हेक्साक्लोराइड
〉 .... हे उत्कृष्ट तणनाशक आहे.
» कॅल्शिअम सायनाइड
〉 सुका बर्फ म्हणजेच .... होय
» स्थायूरूप कार्बन -डाय-ऑक्साइड
〉 मिथेन हे .... प्रकारचे इंधन आहे.
» वायुरूप
〉 ........या कार्बोहायड्रेट्सचा उपयोग कागद व कृत्रिम धाग्यांच्या निर्मितीमध्ये केला जातो.
» सेल्युलोज
〉 मोठ्या आकाराचा कोणता पक्षी ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी आहे.
» इमू
〉 भूमध्य सागरी हवामानाच्या प्रदेशातील वनस्पती जीवनात ओक, बूच व कॉर्क या वृक्षांचा समावेश होतो..... हा या प्रदेशातील विशेष प्रकारचा वृक्ष होय.
» ऑलिव्ह
〉 आफ्रिकेत लेक व्हिक्टोरियातून उगम पावून भू-मध्य समुद्राला जाऊन मिळणारी 'नाईल' ही जगातील सर्वांत लांब नदी कोणकोणत्या देशातून वाहते?
» युगांडा, सुदान व इजिप्त
〉 सहारा वाळवंट व अरबस्तान येथील प्रमुख भटकी जमात कोणती आहे.
» बदाऊनी
〉 कोणता महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे.
» आर्क्टिक
〉 १९९५ -९६ मध्ये सुरू केल्या गेलेल्या जस्टिस आंदोलनाचे नेते म्हणून कोणाचा नामनिर्देश केला जातो?
» इ. व्ही. रामस्थामी नायकर
〉 वंचितांना सामाजिक न्याय मिळवून देण्याच्या उद्दिष्टाने प्रेरित होऊन छेडण्यात आलेल्या जस्टिस आदोलनास कोठून सुरुवात झाली ?
» मद्रास
〉 आत्मसन्मान आंदोलनास तमिळनाडू राज्यात कोणत्या वर्षापासून प्रारंभ झाला?
» इ.स. १९२५
〉 आत्मसन्मान आंदोलनाचे नेते इ. व्ही. रामस्वामी नायकर यांनी आपल्या विचाराच्या प्रचार-प्रसारार्थ कोणते पत्र चालविले होते ?
» कुडी अरासु
〉 वायकोम मंदिर अनुसूचित जातींसाठी खुले करण्यासाठी केव्हापासून आंदोलन सुरू करण्यात आले होते?
» ३० मार्च १९२४






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!