01】 राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील संबंध भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या कलमांनी विस्तृतपणे नमूद केले आहेत ?
अ】 कलम - 73 ब】 कलम - 74
क】 कलम - 76 ड】 कलम - 78
1】 अ, ब आणि क 2】 ब, क आणि ड
3】 अ, ब आणि ड 4】 ब आणि ड ∆
02】 भारताच्या महान्यायवादीं यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ】 त्यांच्या नियुक्तीसाठी वयोमर्यादेची अट नाही.
ब】 भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे.
क】 त्यांच्या पदाचा कार्यकाळ भारताच्या राज्यघटनेने निश्चित केलेला आहे.
वरीलपैकी कोणते / कोणती विधान / विधाने बरोबर आहेत?
1】 अ आणि ब ∆ 2】 फक्त ब
3】 ब आणि क 4】 अ आणि क
03】 खालील बाबींचा विचार करा.
अ】 संविधानानुसार भारताच्या राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच कारभार करावा लागतो.
ब】 राष्ट्रपती त्या सल्ल्याचा पुनर्विचार करण्यासाठी पुन्हा मंत्रिमंडळाकडे पाठवू शकतात परंतु पुनर्विचारानंतर मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नाही.
1】 अ व ब दोन्ही बरोबर आहेत 2】 ब बरोबर व अ चूक आहे ∆
3】 अ बरोबर व ब चूक आहे. 4】 अ व ब दोन्ही चूक आहेत.
04】 महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणा-या सदस्यांची एकूण सदस्य संख्या किती आहे.
1】 288 2】 19 3】 48 4】 67 ∆
05】 भारताच्या राष्ट्रपती संदर्भात खालीलपैकी कोणती विधान / विधाने योग्य आहेत?
अ】 केंद्रीय कार्यकारीची सर्व सत्ता भारताचे राष्ट्रपतीचे ठिकाणी विहित आहे.
ब】 भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान आणि मंत्रीमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही.
क】 भारताच्या राष्ट्रपतीला लोकसभागृहाचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे.
1】 अ, ब 2】 ब, क 3】 अ, क ∆ 4】 वरील सर्व
06】 खालील विधाने विचारात घ्या.
अ】 42 व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रीमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलेला आहे, परंतु अशी तरतूद राज्यपालाबाबत करण्यात आलेली नाही.
ब】 मंत्र्यांनी राज्यपालास काही सल्ला दिला होता काय आणि असल्यास कोणता, या प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही.
1】 विधान अ बरोबर, ब चुक 2】 विधान अ चुक, ब बरोबर
3】 दोन्ही विधाने चुक आहेत 4】 दोन्ही विधाने बरोबर आहे ∆
07】 भारतीय राज्यव्यवस्थेच्या संदर्भातील सत्य विधान / विधाने ओळखा ?
अ】 मंत्रिमंडळ संसदेला संयुक्तरीत्या जबाबदार असते.
ब】 प्रत्येक मंत्री संसदेला वैयक्तिकरीत्या उत्तरदायी नसतो.
क】 पंतप्रधानाला आपले सहकारी निवडण्याचे स्वातंत्र्य असते.
ड】 अल्पसंख्यांकांसाठी मंत्रिमंडळात राखीव जागा असतात.
1】 अ, ब आणि क 2】 अ आणि क
3】 ब आणि ड ∆ 4】 ब, क आणि ड
08】 भारताच्या ॲटर्नी जनरल संदर्भातील खालीलपैकी सत्य विधान / विधाने ओळखा?
अ】 ते संसदेच्या कामकाजात भाग घेऊ शकतात.
ब】 ते संसदीय समितीचे सदस्य होऊ शकतात.
क】 ते संसदीय समितीमध्ये मतदान करू शकतात.
1】 वरील सर्व विधाने सत्य आहेत.
2】 फक्त अ सत्य आहे.
3】 कोणतेही विधान सत्य नाही.
4】 फक्त अ व ब विधाने सत्य आहेत ∆
09】 राजकुमारी अमृत कौर ह्या कोणत्या मतदार संघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या ?
1】 बिहार 2】 केंद्रीय प्रांत ∆ 3】 बाँम्बे 4】 पंजाब
10】 सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्टयांना संविधानाची पायाभूत वैशिष्टये म्हणून मान्यता दिली आहे. पुढीलपैकी कोणत्या वैशिष्टयांचा त्यात समावेश करता येईल.
अ】 समतेचे तत्व ब】 स्वातंत्र्याचे तत्व क】 संघराज्य
ड】 समाजवादी संरचना इ】 न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार
फ】 धर्मनिरपेक्षता
1】 अ, ब, क, ड, इ, फ 2】 अ, क, इ, फ ∆
3】 अ, ब, क, ड, फ 4】 अ, ब, क, इ, फ
11】 खालील विधानांचा विचार करा.
अ】 डॉ. बी.आर. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते.
ब】 श्री. एच.जे. खांडेकर हे या समितीचे सदस्य होते.
1】 ब बरोबर आहे 2】 अ बरोबर आहे ∆
3】 दोन्ही बरोबर आहेत 4】 दोन्ही चूक आहेत
12】 भारतीय संसद कोणते घटक मिळून बनलेली असते ?
1】 विधानसभा, विधानपरिषद, राज्यपाल
2】 राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा ∆
3】 विधानसभा, राष्ट्रपती, राज्यपाल
4】 राज्यसभा, विधानपरिषद, लोकसभा
13】 भारताच्या राष्ट्रपतींकडून लोकसभेत किती अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात.
1】 तीन 2】 दोन ∆ 3】 चार 4】 पाच
14】 सामान्यपणे संघराज्य पद्धतीत कोणत्या पध्दतीचे विधिमंडळ असते ?
1】 व्दिगृही ∆ 2】 एकगृही 3】 बहुगृही 4】 यापैकी नाही
15】 साधारणपणे संसदेच्या दोन अधिवेशनांमधील अंतर किती महिन्यांपेक्षा कमी असावे.
1】 दोन 2】 तीन 3】 चार 4】 सहा ∆
16】 संसदेकडे खालीलपैकी कोणाला पदावरून दूर करण्याचे अधिकार असतात ?
अ】 महालेखापाल
ब】 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
क】 मुख्य निवडणूक आयुक्त
ड】 उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
1】 अ, ब, क आणि ड ∆ 2】 अ, ब आणि ड
3】 अ, ब, क 4】 अ, क आणि ड
17】 महिलांच्या लोकसभेतील प्रतिनिधीत्वासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या आणि सत्य विधान / विधाने ओळखा.
अ】 पहिल्या लोकसभेत केवळ 4.4% महिला सदस्या होत्या.
ब】 16 व्या लोकसभेत त्या सहापट वाढल्या आहेत.
1】 अ ∆ 2】 ब 3】 अ, ब 4】 यापैकी नाही
18】 लोकसभेविषयी कोणती विधाने सत्य आहेत?
अ】 ती संसदबाह्य हस्तक्षेपापासून मुक्त आहे.
ब】 केवळ तिलाच केंद्रपातळीवर कायदे करण्याचा सर्वोच्च अधिकार आहे.
क】 ती सर्वस्वी सार्वभौम आहे.
ड】 ती जनतेला उत्तरदायी आहे.
1】 अ आणि ब 2】 ब, क आणि ड
3】 अ, ब आणि ड 4】 अ आणि ड ∆
19】 बिनविरोध निवडून येणा-या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण ?
1】 विजयालक्ष्मी पंडित 2】 इंदिरा गांधी
3】 शीला दक्षित 4】 मीरा कुमार ∆
20】 देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे _ _ _ _ होय.
1】 राज्य विधिमंडळ 2】 कार्यकारी मंडळ
3】 संसद ∆ 4】 न्यायमंडळ
21】 सनदी सेवकांना _ _ _ _ बनण्याची परवानगी नाही.
1】 संसद सदस्य ∆ 2】 मुख्य निर्वाचन आयुक्त
3】 विद्यापीठाचे कुलगुरू 4】 चौकशी आयोगाचे प्रमुख
22】 घटनेच्या कलम 82 मधील सध्याच्या तरतूदीप्रमाणे, राज्या-राज्यांमध्ये लोकसभेच्या जागांचे समायोजन यापुढे कोणत्या वर्षानंतर होऊ शकते?
1】 2016 2】 2021 3】 2026 ∆ 4】 2031
23】 विधान अ :- भारतात राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात.
कारण ब :- राज्यसभा लोकांपेक्षा राज्यांचे प्रतिनिधित्व करते.
1】 अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण आहे.
2】 अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत पण ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही. ∆
3】 अ हे बरोबर आहे, ब हे चूक आहे.
4】 अ हे चूक आहे पण ब हे बरोबर आहे.
24】 राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात ?
1】 वाङमय, शास्त्र, कला आणि समाज सेवा ∆
2】 शास्त्र, तंत्रज्ञान, कला आणि समाज सेवा
3】 समाजशास्त्रे, संगीत, क्रीडा, कला
4】 समाजशास्त्रे, नृत्य, संगीत, क्रीडा
25】 भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?
1】 डॉ. राजेंद्र प्रसाद ∆ 2】 डॉ. बी. आर. आंबेडकर
3】 जे.बी. कृपलानी 4】 सरदार वल्लभभाई पटेल
26】 संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारले आहे?
1】 अमेरिका 2】 ऑस्ट्रेलिया ∆
3】 जर्मनी 4】 फ्रान्स
27】 भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले ?
1】 पंडित नेहरू 2】 मान्वेंद्रनाथ रॉय
3】 महात्मा गांधी ∆ 4】 डॉ. आंबेडकर
28】 खालील विधाने विचारात घ्या आणि सत्य विधान / विधाने ओळखा
अ】 भारतीय संविधानाने ब्रिटीश संसदीय प्रारुपाचे अनुकरण केले आहे.
ब】 भारतात संविधान सर्वश्रेष्ठ आहे, संसद नव्हे.
क】 भारतातील सर्व न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्याची संविधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही.
1】 फक्त अ 2】 अ व ब ∆
3】 अ व क 4】 अ, ब आणि क
29】 खालीलपैकी कोणती राज्यघटनेची मुलभूत वैशिष्टये समजता येतील ?
अ】 राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व ब】 न्यायालयीन पुनर्विलोकन
क】 कल्याणकारी राज्य ड】 घटनादुरुस्ती बाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार
1】 अ, ब, क 2】 अ, ब
3】 अ, ब, ड। 4】 अ, ब, क, ड ∆
30】 भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
1】 पंडित जवाहरलाल नेहरू 2】 सच्चिदानंद सिन्हा
3】 डॉ. राजेंद्र प्रसाद 4】 डॉ.बी.आर.आंबेडकर ∆
31】 संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते ?
1】 डॉ.बी.आर.आंबेडकर 2】 डॉ. राजेंद्र प्रसाद
3】 जवाहरलाल नेहरू 4】 बी.एन.राव ∆
32】 संघीय शासन व्यवस्थेमध्ये _ _ _ _?
1】 सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते
2】 सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते ∆
3】 यामध्ये केवळ एकच सरकार असते
4】 यामध्ये केवळ प्रांतीय सरकारे असतात
33】 खालीलपैकी कोण संविधान सभेच्या महिला सदस्या होत्या ?
अ】 विजया लक्ष्मी पंडीत ब】 सुब्बलक्ष्मी
क】 सुचेता कृपलानी ड】 सरोजीनी नायडू
1】 अ आणि ब केवळ 2】 अ, क आणि ड ∆
3】 ब, क आणि ड 4】 अ, ब आणि ड
34】 भारतातील राष्ट्रपतींव्दारे होणारी राज्यपालाची निवड पध्दत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे ?
1】 कॅनडा ∆ 2】 ऑस्ट्रेलया
3】 यू.एस.ए 4】 ब्रिटन
35】 भारतीय राज्यघटनेच्या स्त्रोताबाबतच्या खालील विधानांचा विचार करा आणि बरोबर विधान / विधाने ओळखा
अ】 संसदीय लोकशाही - ब्रिटीश राज्यघटना
ब】 संघराज्य - अमेरिकेची राज्यघटना
क】 मार्गदर्शक तत्वे - आयर्लंडची
राज्यघटना
ड】 सामायिक सूची - ऑस्ट्रेलियाची
राज्यघटना
1】 अ एकमेव बरोबर आहे. 2】 अ व ब बरोबर आहेत.
3】 अ, ब आणि क बरोबर आहेत. 4】 सर्व बरोबर आहेत. ∆
36】 राज्यघटनेने प्रशासकीय व वैधानिक एकता राखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तत्वांचा स्वीकार केला आहे .
अ】 एकेरी न्यायव्यवस्था
ब】 मूलभूत नागरी व फौजदारी कायद्याबाबत समानता
क】 समान अखिल भारतीय सेवा
1】 अ, क 2】 अ, ब 3】 ब, क 4】 वरील सर्व ∆
37】 भारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्यामागचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे ?
1】 सत्ता विभाजन 2】 पक्षविरहीत लोकशाही
3】 न्यायालयीन स्वातंत्र्य 4】 लोकशाही विकेंद्रीकरण ∆
38】 संविधान सभेच्या उद्घाटन सत्रामध्ये अध्यक्षांनी कोणत्या देशांच्या सदिच्छा संदेशाचे वाचन केले होते ?
अ】 संयुक्त राज्य अमेरिका ब】 यू.एस.एस. आर
क】 चीन प्रजासत्ताक ड】 ऑस्ट्रेलियाचे सरकार
1】 अ, ब, ड 2】 अ, क, ड ∆
3】 अ, ब, क 4】 ब, क, ड
39】 कोणत्या अल्पसंख्यांक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले ?
1】 शीख ∆ 2】 ख्रिश्चन
3】 अनुसूचित जाती 4】 अनुसूचित जमाती
40】 भारतीय राज्यघटनेच्या नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे म्हणून पुढे केलेल्या खालील तरतुदींचा विचार करा.
अ】 प्रबळ केंद्र आणि केंद्र आणि घटकराज्ये यात अधिकार वाटणी
ब】 एकात्म न्यायसंस्था
क】 अखिल भारतीय प्रशासकीय सेवा
ड】 एकेरी नागरिकत्व
वरील विधानापैकी बरोबर विधान / विधाने ओळखा
1】 अ 2】 अ, ब 3】 अ, ब, क 4】 सर्व ∆
वरील भारतीय राज्यघटनेवर आधारित प्रश्नोत्तरे आपणास कशी वाटली तसेच काही चुका अथवा सुधारणा असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा?
वरील माहिती आपण पहा आणि आवडल्यास इतरांना ही नक्की Share करा.
धन्यवाद...!!
वरील माहिती आपण पहा आणि आवडल्यास इतरांना ही नक्की Share करा.
धन्यवाद...!!
Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!