जगभरातील महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 08 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
28 फेब्रुवारी 1909 रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरी ही 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या ठरावानुसार 08 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
इतिहास
संपूर्ण अमेरिका तसेच युरोपसहित जवळजवळ संपूर्ण जगभरातील स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नव्हता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक उदाहरण होय. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. 1890 मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात 'द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन त्या करीत होत्या. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य कृष्णवर्णीय लोकांनी आणि स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ
मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. 1907 साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. त्यामध्ये क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने 'सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे' अशी घोषणा केली. 08 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री- कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. 1910 मध्ये कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, 08 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 08 मार्च हा 'जागतिक महिला दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून 1918 साली इंग्लंडमध्ये व 1919 साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.
भारतात
भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 08 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला. 08 मार्च 1971 ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे 1975 हे वर्ष युनोने 'जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही 08 मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो.
1975 या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. 1977 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून 08 मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करवा यासाठी आवाहन केले.
मातृदिन
काही देशात म्हणजेच बल्गेरिया आणि रोमानिया येथे हा दिवस मातृदिन म्हणून ही साजरा केला जातो. या दिवशी मुले आपली आई आणि आजी यांना भेटवस्तू देतात.
शुभेच्छा
इटलीमध्ये या दिवशी, पुरुष महिलांना पिवळ्या मिमोसासची फुले भेट देऊन शुभेच्छा देतात. महिला दिन हा आपल्या स्त्रीत्वाचा अभिमान बाळगून त्याचा गौरव करण्याचा दिवस आहे.
जागतिक महिला दिन 2024 थीम
» दरवर्षी वेगवेगळ्या थीमच्या मदतीने हा महिना साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय महिला दिन 2024 मोहिमेची थीम Inspire Inclusion आहे.
» इन्स्पायर इनक्लूजन म्हणजेच महिलांच्या समावेशास प्रेरणा देणे म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिन 2024 आणि त्यानंतरही विविधता आणि सक्षमीकरण साजरे करणे.
» प्रत्येक वर्षी, हा दिवस लिंग समानतेच्या दिशेने केलेल्या प्रगतीचे एक शक्तिशाली स्मरण म्हणून काम करतो आणि अजूनही करणे आवश्यक असलेल्या कामांवर प्रकाश टाकतो.
» 2024 मध्ये, इन्स्पायर इनक्लुजन ही मोहीम थीम समाजाच्या सर्व पैलूंमध्ये विविधता आणि सक्षमीकरणाच्या महत्त्वावर भर देते.
» या वर्षीच्या मोहिमेची थीम लैंगिक समानता प्राप्त करण्यासाठी समावेशाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करते. त्यात अडथळे तोडण्यासाठी, रूढीवादी पद्धतींना आव्हान देण्यासाठी आणि सर्व महिलांना आदर आदर वाटेल असे वातावरण निर्माण करण्यासाठी कार्य करण्याची आवश्यकता आहे.
» इन्स्पायर इनक्लूजन प्रत्येकाला उपेक्षित समुदायांसह जीवनाच्या सर्व क्षेत्रातील महिलांचे अद्वितीय दृष्टीकोन आणि योगदान ओळखण्यासाठी प्रोत्साहित करते.
» शिक्षण आणि जागरुकता समावेशकता वाढविण्यात आणि महिलांचे सक्षमीकरण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
वरील जागतिक महिला दिन या विषयीची माहिती आपणास कशी वाटली तसेच काही चुका अथवा सुधारणा असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा?
वरील माहिती आपण पहा आणि आवडल्यास इतरांना ही नक्की Share करा.
धन्यवाद...!!

महिला दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा
Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!